7/12 verified land parcels · Farmhouse & investment plots only 📞 919307342303 WhatsApp
◆ About Us

We sell land. That's it.

Govindshri Properties — established 2018, specializing in verified agricultural and farmhouse land across Maharashtra.

◆ About Govindshri Properties

Established 2018

Govindshri Properties is the brand established by the owners from Year 2018 with a vision to invent, explore and reinvest in the business of Real Estate, especially land.

Govindshri Properties specializes in buying land in rural areas and developing it for residential, commercial, or agricultural purposes. We typically purchase land, plan the development, obtain necessary permits, and then prepare it — or manage and sell the land after it’s been prepared. Our strength is customer satisfaction.

Buying land is an essential part of everyone’s life, and we ensure that the process is safe, sustainable and easy to understand for our clients. Our mission is to simplify the real estate experience for our clients by offering them the best property options suited to their requirements.

We believe in transparency, honesty, and integrity, and we are committed to building long-lasting relationships with our clients based on trust and respect. As a team, we constantly strive to innovate and improve our services to exceed our clients’ expectations and make their real estate journey as smooth and rewarding as possible.

We envision a world where every individual finds their dream agricultural land, where a residential bungalow or farmhouse can be built — offering a blend of rural living and agricultural pursuits with ease. We strive to create a positive impact on the communities we serve by offering the best possible advice and support.

◆ Our Founder

माझा प्रवास...

सन २००६ मध्ये माझे पदवी शिक्षण (Graduation) पूर्ण झाल्यानंतर मी MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. प्राथमिक (Pre) आणि मुख्य (Mains) परीक्षांचा मी मनापासून अभ्यास केला. मात्र, काळाच्या ओघात मला जाणवले की माझी खरी आवड आणि क्षमता लोकांशी संवाद साधणे, जमिनी समजून घेणे आणि त्यांना योग्य गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणे यामध्ये आहे.

आमच्या गावाकडे शेती आणि जमिनीशी लहानपणापासूनच जवळचा संबंध असल्यामुळे जमीन, तिचे महत्त्व आणि तिची किंमत याविषयीची समज मला नैसर्गिकरीत्या मिळाली होती. त्यामुळे मी रिअल इस्टेट क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच निर्णयाने माझ्या आयुष्याला नवी दिशा दिली.

सुरुवातीला विविध रिअल इस्टेट संस्थांमध्ये काम करताना मी प्रत्येक व्यवहारातून शिकत गेलो. प्रॉपर्टी मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर आणि CEO अशा जबाबदाऱ्या सांभाळताना ग्राहकांचा विश्वास, कायदेशीर प्रक्रिया आणि पारदर्शक व्यवहार हीच माझी खरी ताकद बनली.

आज मी ज्या प्रत्येक जमिनीची विक्री करतो, ती प्रथम स्वतःच्या नावावर खरेदी करून, तिची संपूर्ण कायदेशीर पडताळणी, सरकारी मोजणी, सातबारा, फेरफार, प्लॉट डिमार्केशन, रस्ते, पाणी आणि इतर आवश्यक सुविधा पूर्ण केल्यानंतरच ग्राहकांना उपलब्ध करून देतो.

माझ्या संपूर्ण प्रवासात मी एक गोष्ट कधीही बदलू दिली नाही—प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि दिलेला शब्द. माझ्यासाठी प्रत्येक ग्राहक हा केवळ व्यवहार नसून, दीर्घकाळ टिकणाऱ्या विश्वासाचा भाग आहे.

आज गोविंदश्री प्रॉपर्टीज ही केवळ एक रिअल इस्टेट कंपनी नाही, तर माझ्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे, अनुभवाचे आणि ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे. माझे ध्येय फक्त जमीन विकणे नाही, तर प्रत्येक ग्राहकाला सुरक्षित, कायदेशीर आणि विश्वासार्ह गुंतवणूक उपलब्ध करून देणे आहे.

"माझा विश्वास आहे की, प्रामाणिकपणे केलेले काम आणि समाधानी ग्राहक हीच कोणत्याही व्यवसायाची खरी ओळख असते."

— प्रकाश संभाजी सुरोशे
संस्थापक व प्रोप्रायटर, गोविंदश्री प्रॉपर्टीज

Founder - Govindshri Properties
Govindshri Properties Office
◆ Why Invest Here

राजगड–वेल्हे परिसरात गुंतवणूक का करावी?

गोविंदश्री प्रॉपर्टीजमध्ये आम्ही केवळ जमीन विकत नाही, तर तुमच्या भविष्यासाठी सुरक्षित, कायदेशीर आणि मूल्यवान गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देतो.

आमचे सर्व प्रकल्प राजगड–वेल्हे परिसरात, गोविंदश्री प्रॉपर्टीजच्या सिंहगड रोड, पुणे येथील कार्यालयापासून अवघ्या ३५ किलोमीटर अंतरावर तसेच पुणे शहरापासून सुमारे ४५ किलोमीटरच्या परिसरात आहेत. त्यामुळे शहराच्या गजबजाटापासून काही अंतरावर, पण सहज पोहोचता येईल अशा ठिकाणी तुमची स्वतःची जमीन असण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

पुण्यातून या परिसरात येण्यासाठी चार पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे वाहतुकीची उत्तम सोय असून प्रत्येक प्रवास हा निसर्गरम्य अनुभव देणारा ठरतो.

या परिसराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इतिहास, निसर्ग आणि आधुनिक विकास यांचा सुंदर संगम. प्रवासादरम्यान किंवा प्रकल्पांच्या परिसरात तुम्ही खडकवासला धरण, सिंहगड किल्ला, पानशेत धरण, वरसगाव धरण, गुंजवणी धरण, राजगड किल्ला, तोरणा किल्ला, मढे घाट, सिंगापूर व्हॅली, बनेश्वर मंदिर आणि भाटघर धरण अशा अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांचा आनंद घेऊ शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे राजगड, तोरणा आणि सिंहगड हे किल्ले या परिसराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून देतात.

या भागातील वळणावळणाचे (Zig-Zag) घाटरस्ते, डोंगररांगा, धरणांचे विहंगम दृश्य, फोर्ट व्ह्यू, डॅम व्ह्यू, हिरवागार निसर्ग आणि शांत वातावरण प्रत्येक भेट अविस्मरणीय बनवतात. वीकेंडला कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी किंवा स्वतःच्या फार्महाऊसचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा परिसर अत्यंत योग्य आहे.

आमच्या प्रकल्पांची आणखी काही वैशिष्ट्ये:

  • PMRDA च्या प्रभाव क्षेत्राजवळील निवडक प्रकल्प
  • स्टेट हायवेला लागून किंवा सहज जोडलेले रस्ते
  • रोड-टच प्लॉट्सची उपलब्धता
  • PMPL व MSRTC (एसटी) सार्वजनिक वाहतुकीची सुविधा
  • शहराजवळ असूनही शांत आणि प्रदूषणमुक्त वातावरण
  • डॅम व्ह्यू, फोर्ट व्ह्यू आणि निसर्गरम्य लोकेशन्स
  • फार्महाऊस, सेकंड होम आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य परिसर

प्रत्येक प्रकल्पामध्ये आम्ही खालील बाबींची संपूर्ण काळजी घेतो:

  • स्वतःच्या मालकीची आणि कायदेशीरदृष्ट्या पडताळणी केलेली जमीन
  • स्वच्छ व निर्विवाद सातबारा
  • सरकारी मोजणी
  • प्लॉट डिमार्केशन
  • अंतर्गत रस्ते
  • पाणी व वीज नियोजन
  • सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता
  • "प्रथम ताबा, नंतर खरेदीखताच्या दिवशी पैसे" ही आमची पारदर्शक कार्यपद्धती

पुण्याच्या मुंबई, नाशिक, नगर आणि सोलापूर महामार्गावरील जमिनींच्या वाढलेल्या किमतींच्या तुलनेत राजगड–वेल्हे परिसर हा अजूनही गुंतवणुकीसाठी आकर्षक पर्याय आहे. वाढती कनेक्टिव्हिटी, नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि विकसित होत असलेली पायाभूत सुविधा यामुळे या परिसराकडे अनेक गुंतवणूकदार लक्ष देत आहेत.

गोविंदश्री प्रॉपर्टीजचे ध्येय फक्त जमीन विकणे नाही, तर प्रत्येक ग्राहकाला विश्वास, पारदर्शकता आणि कायदेशीर सुरक्षिततेसह त्याच्या स्वप्नातील जमीन मिळवून देणे आहे.

गोविंदश्री प्रॉपर्टीज – विश्वासाची ओळख, पारदर्शक व्यवहार आणि सुरक्षित गुंतवणुकीचा विश्वासू साथी.

"आजची योग्य गुंतवणूक... उद्याचे सुरक्षित भविष्य... आणि निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःची ओळख – गोविंदश्री प्रॉपर्टीज."

Our Focus

Why only land?

Flats depreciate with the building. Land doesn't. We chose to specialize in one thing — farmhouse plots and long-term investment land — so we can know every parcel we sell in detail: its title history, its access road, its soil, its water source.

No flats. No under-construction buildings. No confusing carpet-area math. Just land, with paperwork you can trust.

✔

Verified Title

Every listing is checked against the 7/12 extract and title chain before it goes live on the site.

🤝

No Pressure Selling

We share the full picture — good and bad — and let you decide on your own timeline.

Looking for the right piece of land?

Tell us your budget and purpose — we'll do the shortlisting.

Contact Us